Zundiche Manasashastra (झुंडीचे मानसशास्त्र)
झुंडीचे मानसशास्त्र अवगत असणे, ही गोष्ट अनेक लोकांच्या दृष्टीने फायद्याची असते. जगातील मोठमोठे कर्तबगार पुरुष, धर्मप्रवर्तक, साम्राज्यांचे संस्थापक, भिन्न-भिन्न विचारसरणींचे निष्ठावंत अनुयायी, प्रसिद्ध राजकारणपटू हे सर्वजण प्रच्छन्न मानसविशारद होते. झुंडींची मानसिक जडण-घडण कशी असते, हे या सर्वांना जणू जन्मतः कळते. या उपजत आणि अचूक ज्ञानाच्या जोरावरच ही मंडळी स्वत:चे श्रेष्ठत्व प्रस्थापित करू शकतात.