THE ROZABAL LINE

THE ROZABAL LINE दि रोझाबल लाइन

ASHWIN SANGHI2023
"अश्विन संघी यांच्या `भारत सिरीज` मधील एक पुस्तक. लंडनमधील वाचनालयातील एका फळीवर पुट्ट्यांचे एक खोके सापडते. गोंधळलेल्या ग्रंथपाल ते खोके उघडतात. खोके उघडताच त्यांच्या तोंडून किंकाळी फुटते आणि त्या बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळतात. व्हॅटिकनमधील चक्रव्यूहासारख्या कुठल्याशा खबदाडीत, एक सुंदर मारेकरी तिच्या विक्षिप्त संप्रदायाविषयी श्रद्धा न बाळगणाऱ्या सर्वांना नष्ट करण्याची शपथ घेते. स्वतःला लष्कर-ए-तलतशार म्हणवणारं तेरा जणांचं सैन्य जगभर विखुरलेलं आहे. ख्रिस्त आणि त्याच्या शिष्यांचे दैव आणि या सैन्यातील सदस्यांचे दैव यांच्यात एक कुतूहलजनक साम्य आहे. त्यांचं ध्येय आहे आर्मागेडॉन. एका हिंदू ज्योतिष्याला आकाशातील विशिष्ट ग्रहांची युती जवळ आल्याचं लक्षात येतं. जगाचा अंत जवळ आल्याच्या जाणिवेने तो सुन्नपणे मान हलवतो. तिकडे तिबेटमध्ये एक बौद्ध भिक्खूंचा समूह ज्याप्रकारे त्यांच्या पूर्वजांनी ज्युदेआमध्ये ईश्वरपुत्राचा शोध घेतला होता त्याचप्रमाणे अवताराच्या शोधात निघतात. जेरुसलेममध्ये निर्माण झालेल्या या कोड्याची गुरुकिल्ली असते संघर्षाने ग्रस्त काश्मीरमधल्या रोझाबल नावाच्या एका कबरीत आणि ते कोडं सुटणार असतं वैष्णोदेवीत. एका अमेरिकन प्रिस्टला परिचित माणसांची अस्वस्थ करणारी दृश्यं दिसतात. फक्त ही दृश्यं आणि त्यातली लोकं कुठल्यातरी दुसऱ्याच काळात आहेत असं त्याला वाटत असतं. गतजन्मांतील स्मृती जाग्या करून तो या हिंसक प्रतिमांचे सुटे तुकडे एकत्र जोडण्यासाठी भारतात आलाय. त्याच्या प्रत्येक हालचालीवर सावलीसारखं लक्ष ठेवून आहे. क्रक्स डेकुरसाटा पर्म्युटा ही गुप्त संघटना. या संघटनेला प्राचीन रहस्य उघड होऊ देण्याऐवजी त्याची निर्मितीच पुसून टाकायचीय. दि रोझाबल लाइन ही एक रहस्यमय कादंबरी अनेक शतकांमधून आणि खंडांमधून उलगडत जाते. अश्विन सांघी गुंत्यांमधील वेटोळ्यांचा माग काढता काढता धर्माच्या रक्तरंजित जन्मापर्यंत पोचतात."
Sign up to use